#एक_vote_की_किमत....... (by भारतीय नागरिक)
निवडणूक उंबरठ्यावर आहे. कुठेही जा...मोदी विरुद्ध नॉन-मोदी.. असं चित्र दिसतंय!! विरोधक एका पक्षा विरोधात पेक्षाही एका व्यक्ती च्या विरोधात इतकी 'एकजूट ' दाखवत आहेत की ज्याचं नाव ते!
आणखी एका गोष्टीत भयंकर एकमत आहे ...ते म्हणजे ...'मला सत्ता हवी.' या साठी आपापले पक्ष सोडून देऊन इकडे तिकडे पळापळ सुरू आहे नेत्यांची..!! किंवा..आम्ही सत्तेत राहून च सत्तेत असणाऱ्या भागीदारावर 'लक्ष' ठेवू ( पण...सत्ता सोडणार नै म्हंजे नै)
एक पोस्ट फिरते....पक्षातले कार्यकर्ते कढीपत्त्या सारखे....फोडणीत सर्वात आधी आहूती आणि चव घेताना सर्वात आधी ताटा बाहेर..😢 बंद पुकारताना, राडे घालताना ,पकडले जाताना हे कार्यकर्ते पुढे घातले जातात ...सर / साहेब/ प्रमुख एसी ऑफिस मधे बसून असतात..!! मग 'तरूण रक्ताला संधी ' देण्याची वेळ आली की मात्र मुले , जावई , नातवंडे ( पार तिसरी पिढी😁 ) यांचाच विचार होतो. मग त्यांची बोलताना भंबेरी का उडेना?
इतक्या उघडपणे स्वतः चा हावरटपणा सत्तापिपासुत्त्व जनतेला दाखवून निवडणूक जिंकायचं स्वप्न बघू शकतात हे नीच नेते? कसलीच चाड नाही.😒 प्रस्थापित असोत की वंचित .....कुणाकडे #नाव आहे ..तर कोणाकडे #नाक ...😫 आणि जो तो समोरच्या कडे बोटं दाखवतो आहे.
उभे केलेल्या उमेदवारांपैकी एकाला आपण निवडू शकतो ...पण कोणाला उभं केलं जावं याची आपण निवड करू शकत नाही. मला एक्कही उमेदवार पसंत नसेल तर '#नोटा ' चा पर्याय आहे....!! पण व्यक्तिगत मला हा पर्याय निरर्थक वाटतो. नोटा चं % वाढलं...परत निवड प्रक्रिया होणार ...असं असतं त एकवेळ ठिक होतं ....तसं काहीच होणार नाही. म्हणजे च मतदान न केल्यातच जमा!!😢
मला वाटतं ...मतदान च नको / नोटा पर्याय घेणं ....हे दोन्हीही टाळलं पाहिजे. त्यातल्या त्यात कमी भ्रष्ट ...असा निकष लावा ..पण कोणा ना कोणा उमेदवाराला प्रत्येकाचं 'एक मत' जायलाच हवंय. तरच बरं -वाईट ..योग्य -अयोग्य ...आवळ्या-भोपळ्याचं सरकार तयार होईल.
जाती भेद , वंशभेद , बेरोजगारी , आर्थिक समस्या आणि दहशतवाद ....हे गंभीर प्रश्न आहेत .....आणि ते नाहीत असा एक तरी देश जगाच्या पाठीवर शोधून बघुया....बघूया कोणाला सापडतो ? पण कसाही आहे ..हा माझा भारत आहे. माझं बरचसं आटोपलंय ...पण माझ्या मुलाची तर अजून सुरुवात ही झालेली नाही..!! तो आज विचारतो....'.तू कोणाला मत देणार आई? ' आणि पुढचा प्रश्न ...जास्त महत्त्वाचा ...'का?' पहिल्या चं सोप्पं उत्तर दुसऱ्या प्रश्नाला आपल्याला विचारात पाडता कामा नये. तुमचं मत द्या ...ठामपणे द्या.... कारणासकट द्या.
जमलं तर तुमच्या मुलांची किंवा आजूबाजूच्या मुलांची नागरीकशास्त्राची ( civics किंवा political science ची) पुस्तकं वाचून ..आपण नक्की कुठल्या निवडणूक प्रक्रियेत सामील होणार आहोत...याचा अंदाज घ्या. जेणेकरून पक्ष की नाव की उमेदवार ...हे ठरवताना सोपं जाईल.😊 सर्वाधिक महत्त्वाचा विषय सर्वात 'बोअर' आणि कमीत कमी मार्कांचा असायचा ..नै?
गरज पडली तर सुट्टी घ्या. कामा निमित्ताने तुमचं नाव असलेल्या मतदान केंद्रापासून लांब असाल तर ...प्रवासाची दगदग करा...मतदान केंद्राबाहेर अशा पांगलेल्यांचं एखादं गेट टूगेदरच करून टाका ना? तुमच्या पुढच्या पिढीला मतदानाचं महत्त्व पटवून देण्याची सोन्यासारखी संधी दवडू नका😊
एक वोट की किमत हम तो जानते हैं ---बाबू ....किंवा एक वोट भी बहुत बड़ी चीज़ होती है बाबू.....वगैरे वगैरे वगैरे........
#भारतीय_नागरिक