आठवणी वादळासारख्या , लाटांसारख्या असतात. एक आली की पाठून दुसरी येते , तिसरी येते ....जाणारीला परत किनाऱ्याला आणणारी आणीक एक येते!!
पूर्वी एखादे रंजक पुस्तक वाचायला बसले की मन म्हणायचं ...हा एक्कच भाग वाचून ठेऊन देऊ ...परीक्षा आहे , अभ्यास आहे , गृहपाठ आहे!! मग वाचता वाचता कधी पुढल्या भागात पोहोचायचे ते कळत नसे ...मग परत म्हणायचं , नै नै ..हा आता शेवटचाच भाग वाचू! ! उरलेलं नंतर वाचू 😀
भूतकाळातल्या आठवणींचंही असंच काहीसं होतं!! त्यात जर त्या 'रम्य बालपणीच्या' किंवा 'कर्तबगारीच्या' काळातल्या असतील तर मन परत वर्तमानात यायला खूपच खळखळ करतं!
तुमचा अनुभव?
#प्रज्ञा
No comments:
Post a Comment