#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#एक
माझे बाबा सिव्हिल इंजिनिअर होते. Scalene नावाची स्वत:ची कंपनी आणि प्लंबिंग काॅन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी ३२ वर्ष व्यवसाय केला.
त्यांच्या कडेचे कामावरचे कामगार, कामावरची हत्यारं ( पाना , हातोडी , लेवल बाटली , व्हाल , गाॅज, व्हायसर 😂) हे बघत मी मोठी झाले.
ही माणसं वर्षानुवर्षे बाबांकडे कामाला होती. बाबांचे ठरलेले 'मालवाले' होते ...हिम्मतलाल , मगनलाल , बाटलीवाला ...अशा नावाचे !! या मालवाल्यांना बाबांकडे टिकलेली माणसं पाहून आश्चर्य वाटत असे. सहसा रोजावर काम करणारी (daily basis वर) माणसं एकाच contractor कडे टिकून रहाणं जवळपास अशक्य असतं.
या व्यवसायात जून ते ऑगस्ट ..तीन महिने जवळपास काहीच काम नसे! आमच्या शाळा सुरू झाल्या की बाबांची सुट्टी सुरू व्हायची ... आणि 'वसूली' रोज फोनाफोनी, चढलेले आवाज , गुजराथी, हिंदी, इंग्रजी मधून बाबांचं बोलणं! कामं नाहीत, बरेच ठिकाणी पैसे येणं बाकी आणि माणसांचे 'रोज' मात्र चालू!! माझ्या बाबांना येणारा ताण, त्यांचं चिंतातूर होऊन जाणं पाहून शेवटी आई आणि माझे काका (ते पण सिव्हिल इंजिनिअर होते) म्हणत की माणसांना जाऊ दे कुठे दुसरीकडे वा गावी ... सुट्टी करून टाकायची एखाद्दोन महिने!
पण बाबांनी काय किंवा काकांनीही ..कायम सगळी माणसं तीन महिने कामं नसूनही रोजावर ठेवण्याची सवय सोडली नाही.म्हणायचे ... ही मी तयार केलेली माणसं आहेत, त्यांची सुट्टी करून दुसऱ्या कोणाला आयते 'कुशल कामगार' (skilled workers) देऊ? .. उद्या आलं पटकन काम ..तर परत कुठे शोधणार यांना?
बाबांकडे काम नसतानाही माणसांचा 'रोज' चालू रहायचा. ही भर पगारी सुट्टी त्यांना मानवायची. कोणी गावी जात ...येताना आंबे , खाजे , काजू , चिंचेचे गोळे आणत! कोणी छोटी मोठी कामे मिळाली तर तिही करत. पण खरे शेट च्या एका हाकेवर परत हजर होत!
नथुराम कामाला आला तेंव्हा पंधरा वर्षांचा होता. त्याने बाबांकडे शेवटपर्यंत काम केलं. तो स्वत: रंग लावण्याची contracts घेऊ लागला. त्याच्या भावाला ...जितू ला पण खरे शेट कडेच लावायचा... म्हणून मुंबईत घेऊन आला !! हा जितू थोडंफार शिकलेला होता...बाबांनी त्याला आणि आणखीही काही जणांना इतर छोटे मोठे courses ...वायरमन , टर्नर फिटर वगैरे शिकायला मदत केली. जितू .. जितेंद्र नंतर एके ठिकाणी proper job करू लागला.
एकेका माणसांचे , कामांचे कडू गोड चांगले वाईट किस्से आहेत!! नथु ,जीतू , विजय , सदाशिव , रामचंद्र , काळेले ..सगळे सांगायचा माझा विचार आहे. अर्थात रोज किंवा एक दिवस आड करून एखादी पोस्ट !!
आवडतात का सांगा!!
#PradnyaSubodhAhire

No comments:
Post a Comment